अनिल (पाटील) सुर्डीकर - लेख सूची

लोकनेता: शाहणा

मे महिन्यातली सकाळ! कडक उन्हाळा! सकाळचे नऊ-साडेनऊ वाजलेले! काल संध्याकाळी गावाशेजारच्या मोठ्या गावात मोर्चा निघालेला होता, व शेवटी मोर्चा सरकारी धान्याच्या गोडाउनवर गेला. नंतर पोलिसांच्या लाऊडस्पीकरवरून कडक सूचना. शेवटी मोर्चेकऱ्यांनी न ऐकल्याने लाठीमार, अश्रुधूर व गोळीबाराचे आदेश. सात-आठ लोकांचा गोळ्या लागल्याने जागेवरच मृत्यू व अनेक जखमी. बाकीचे हौशे-नवशे आपापल्या गावांकडे पळाले. अर्थातच रात्री व रात्रभर …

गावगाडा – खाद्यसंस्कृती

पूर्वी खेडेगावातल्या प्रथेप्रमाणे लहान, थोर, श्रीमंत, सर्वांकडे, आपल्या इथे जे पिकते तेच खायचे अशी पद्धत होती. त्यामुळे बहुतेकांच्या घरी सारखाच मेनू असे. दररोजच्या जेवणात ज्वारीची भाकरी, साधारण परिस्थिती असलेल्या लोकांकडे कोरडे कालवण, ‘कोरड्यास’ म्हणजे भाजी अथवा दाळ, जी भाकरीवर घालून भाकरी दुमडून ‘पॅक’ करता येईल असे पदार्थ असत. जरा बरी परिस्थिती असलेल्यांकडे पातळ कालवण भाजी …

लोकनेता

आपल्या लोकशाही राज्यप्रणाली असलेल्या देशात आमदार अथवा एमएलए ही थेट निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये सर्वात महत्त्वाची कड़ी आहे. एकाच वेळी ती जनतेच्या सर्व थरांत संबंध असलेली व सरकारांतही अधिकार असलेली व्यक्ती असते. सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी केल्यावर वा करताना त्याची काय प्रतिक्रिया येते ते सर्वप्रथम कळणारी ती व्यक्ती असते. त्याला बरीच तारेवरची कसरत करावी लागते. एकतर त्याला …

ग्रामीण संस्कृती

‘संस्कृती’ हा मोठा सर्वसमावेशक शब्द आहे! त्यात काय काय अंतर्भूत होते हे एखाद्या व्याख्येत बसविणे कठीण! तरीपण हा शब्द सर्रास वापरला जातो व बहतेक ठिकाणी त्याचा उपयोग योग्य त-हेनेच झालेला असतो. एका मताप्रमाणे या शब्दाचे अनेक अर्थ संभवतात व संदर्भाने त्याचा अर्थ लावला जातो! साधारणपणे संस्कृती म्हणजे ‘कोणत्या प्रसंगी कोणा व्यक्तीने कसे वागावे, बोलावे विचार …

गावगाडा : सहकार (भाग-२)

शेतीसारखा व्यवसाय करणारा समाज हा, हा व्यवसाय करण्याइतका सक्षम असला पाहिजे. कारण दर १-२ वर्षांनी त्याच्यावर काहीतरी अस्मानी संकट येत असते. कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी, तर कधी बेमोसमी पाऊस, तर एखादी कीड, तर कधी कमी पिकलेल्या धान्याची परदेशातून आयात. सरकारच्या सर्व विभागांकडून, म्हणजे नियोजन खाते, अर्थखाते, पाणी-पाटबंधारे, वीज या सर्व विभागांकडून त्याच्याविषयीचा दृष्टिकोन हा …

निवडणुका, खरे स्वरूप व मध्यमवर्ग (भाग-३)

[End of Ideology (तत्त्वादर्शीचा अंत!), Criminalization of Politics (राजकारणाचे गुन्हेगारीकरण), ह्या कळीच्या संकल्पना गेल्या लेखांशांत आल्या होत्या. आता इतर काही कळीच्या संकल्पना पाहू या लेखात आपण आतापर्यंत जे प्रतिपादन केले त्याचा सर्वसाधारण आशय असा की जे मतदार सरकार निवडून देतात त्यांचे त्या विशिष्ट मतदाराला निवडून देण्याचे निकष सर्वस्वी निराळे असतात. पक्ष व त्यांचे नेते यांची …

निवडणुका, खरे स्वरूप व मध्यमवर्ग (भाग-१)

[आपल्या देशाचे क्षेत्रफळ जगात पाचव्या क्रमांकाचे क्षेत्रफळ आहे, लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे आणि राज्यपद्धती ‘लोकशाही’ ही जगात प्रथम क्रमांकाची आहे. आपल्या देशात सुमारे ७० कोटी नोंदविलेले मतदार आहेत. आपला कार्यक्षम ‘निवडणूक आयोग’ या सर्व मतदारांचे मतदान एका कार्यकाळात घेऊ शकतो, मतदानातले सर्व संभाव्य गैरप्रकार न होतील, अशी काळजी घेऊन! जगातल्या प्रगत देशांतल्या लोकांना मोठे …

निवडणुका, खरे स्वरूप व मध्यमवर्ग (भाग-३)

या लेखात आपण आतापर्यंत जे प्रतिपादन केले त्याचा सर्वसाधारण आशय असा की जे मतदार सरकार निवडून देतात त्यांचे त्या विशिष्ट मतदाराला निवडून देण्याचे निकष सर्वस्वी निराळे असतात. पक्ष व त्यांचे नेते यांची स्टेजवर बोलण्याची व प्रत्यक्षातली उद्दिष्टे यांच्यात फार अंतर असते. जेव्हा एखादा उमेदवार निवडून येतो तेव्हा अनेकांची अनेक उद्दिष्टे साध्य झालेली असतात. प्रसंगी ती …

निवडणुका, खरे स्वरूप व मध्यमवर्ग (भाग-२)

[End of Ideology (तत्त्वादर्शाचा अंत!) ही कळीची संकल्पना गेल्या लेखांशात आली. Criminalization of Politics (राजकारणाचे गुन्हेगारीकरण), मध्यमवर्गाचा संभ्रम, या काही कळीच्या राजकीय संकल्पना प्रत्यक्षदर्शी व सोप्या पद्धतीने स्पष्ट करणारा हा लेखांश आहे, मूलभूत महत्त्वाचा.] या लोकशाहीच्या नमुन्याची रचना करताना, देशी विदेशी घटनेच्या रचनाकारांचा विचार करताना त्यांच्याकडून कदाचित काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाले असावे. घटना बनविताना मानवी …

निवडणुका, खरे स्वरूप व मध्यमवर्ग (भाग-१)

[आपल्या देशाचे क्षेत्रफळ जगात पाचव्या क्रमांकाचे क्षेत्रफळ आहे, लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे आणि राज्यपद्धती ‘लोकशाही’ ही जगात प्रथम क्रमांकाची आहे. आपल्या देशात सुमारे ७० कोटी नोंदविलेले मतदार आहेत. आपला कार्यक्षम ‘निवडणूक आयोग’ या सर्व मतदारांचे मतदान एका कार्यकाळात घेऊ शकतो, मतदानातले सर्व संभाव्य गैरप्रकार न होतील, अशी काळजी घेऊन! जगातल्या प्रगत देशांतल्या लोकांना मोठे …

ग्रामीण अर्थव्यवस्था व शेतकरी

आपण गेल्या २-३ वर्षांत विशेषतः शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल बऱ्याच बातम्या वाचल्या व त्यावरचे विचारवंतांचे, राजकीय पक्षांच्या धुरीणांचे लेख वाचले. समित्या नेमलेल्या ऐकल्या. त्यांचे अहवाल वाचले. पण अजूनही परिस्थितीत फारशी सुधारणा नाही. याचे एक कारण असे की राज्यकर्ते नेहमीप्रमाणे या अरिष्टावर काही तरी मलमपट्टी उपाय करू पाहत आहेत व या सर्व गोष्टींच्या मागे जो मूळ प्रश्न आहे …

पाणी व्यवस्थापनः सोपे उपाय

आ.सु.चा एप्रिल २००९ च्या अंकातील लेखात शेतीला लागणारे एकूण पाणी यासंबंधीचे विवेचन वाचले. मला शेतीला लागणाऱ्या पाण्याविषयी काही सांगावेसे वाटले म्हणून हे पत्र ! शेतीसाठी अथवा इतर उपयोगांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत हा पडणारा पाऊस आहे. आता त्याच्यावर आपले म्हणजे एकूणच मनुष्यप्राण्याचे फारसे नियंत्रण नाही. या शास्त्रात काम करणारे आपले जे दिग्गज शास्त्रज्ञ आहेत त्यांचे काम …

‘बेजवाडी’ शेती

गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या बऱ्याच प्रमाणात होत आहेत. एक आकडेवारी सांगते की दर बारा तासाला एक, इतक्या मोठ्या प्रमाणावर त्या होतात. त्याची दखल त्या मानाने फार कमी ठिकाणी घेतली जाते. सरकारपक्षाला अजून तरी ती त्यांची जबाबदारी वाटते हे नशीबच! सरकारपक्षाचे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीने झालेले प्राणहानी व वित्तहानी याबाबतचे आकडे नेहमी वृत्तसंस्थांच्या त्याच आकड्यांपेक्षा …

द्राक्षबागायत, निमित्त, लागवड व विक्रीव्यवस्था

मी साधारण १९७३-७४ सालात द्राक्षबाग लावण्याचे ठरविले कारण माझे काही मित्र (ज्यांच्या व माझ्या परिस्थितीत बरेच साम्य होते) ते बऱ्याच अंशी यशस्वी द्राक्षबागायतदार होते. मला खरे म्हणजे ‘द्राक्षउद्योजक’ हा शब्द अधिक समर्पक वाटतो. कारण सध्याच्या द्राक्षांचे उत्पादन, विक्री इत्यादींचे स्वरूप पाहता द्राक्ष पिकवणारा शेतकरी उद्योजकच असला पाहिजे असे वाटते. सध्या महाराष्ट्र आपल्या देशात जी खाण्याची …

गावगाडा २००६ (भाग ३)

दुष्काळी भाग, निरीक्षणे व चिंतन खेड्यात राहणारी, विशेषतः दुष्काळी भागातील माणसे सभोवतालच्या परिस्थितीमुळे रुक्ष झालेली असतात असे आपल्याला अनेक गोष्टींतून प्रत्ययास येते. म्हणजे जेवण करणे, हा एक आवश्यक नैसर्गिक उपचार असतो. बाकी काही नाही. ज्यांना त्या क्रियेला ‘उदरभरण’ म्हणणेसुद्धा रुचत नाही त्यांना हे ऐकून आश्चर्य वाटेल. बऱ्याच वेळा खेडूत बंधू ‘तुकडा खाणे’ किंवा ‘तुकडा मोडणे’ …

गावगाडा २००६ (भाग-२)

[सध्याच्या खेडेगावांमधील सामाजिक स्थितीवर गांवगाडा-२००६ या नावाने काही लेख प्रकाशित करण्याची इच्छा आम्ही गेल्या अंकात नोंदली. अनिल (पाटील) सुर्डीकर यांच्या लेखाचा एक भागही गेल्या अंकात प्रकाशित झाला. हा लेखाचा पुढील भाग दिवाळीनंतर येते कार्तिकी एकादशी, पंढरपूरची वारी. एकूण चार मोठ्या एकादश्या आषाढी, कार्तिकी, माही व चैत्री. त्यांपैकी जास्त मोठ्या आषाढी व कार्तिकी. हा इकडचा भाग …

गावगाडा २००६ (भाग-१)

[त्रिंबक नारायण आत्रे यांचे गांवगाडा हे पुस्तक गेल्या शतकाच्या सुरुवातीच्या ग्रामीण महाराष्ट्राच्या समाजजीवनाचे उत्कृष्ट चित्र रेखाटते. प्रथम प्रकाशन १९१५ साली झालेले हे पुस्तक आजही उपलब्ध आहे. (‘वरदा’, पुणे, १९८९). मधल्या काळात पुस्तकातील अनेक शब्द सामान्य वाचकांना अनोळखी झाले असतील, या भावनेतून रा.वि. मराठे यांनी ‘गांवगाडा’चा शब्दकोश लिहून प्रकाशित केला. (मंजिरी मराठे, मुंबई, १९९०). पुस्तकाला पन्नास …

अनुभव

माझ्यासारखा सामान्य माणूस काय नवीन अनुभव सांगू शकणार? तरीपण काही लोकांना ज्यांना अजिबातच या विषयीची माहिती अथवा ीीश नाही, त्यांना त्यात ळपींशीशीीं वाटण्याची शक्यता आहे असे वाटून आज काहीतरी लिहावे असे मी ठरवले आहे. माझे शिक्षण अभियांत्रिकीमधले. मी पास झाल्यावर २-३ वर्षांनी बार्शीला आलो आणि वाटले की आपला पिढीजात व्यवसाय कोणता, तर शेतीचा! मग आपल्याकडे …